प्राचीन ग्रीसमध्ये सॉक्रेटिस नावाचा एक अत्यंत ज्ञानी तत्त्वज्ञ होता.
एके दिवशी सॉक्रेटिसचा एक ओळखीचा माणूस त्याला भेटला आणि म्हणाला, "मी तुझ्या मित्राबद्दल काय ऐकले आहे ते तुला माहीत आहे?"
सॉक्रेटिसने उत्तर दिले, "एक मिनिट थांब तुम्ही माझ्या मित्राबद्दल बोलण्यापूर्वी, तुम्ही माझ्या तीन सोप्प्या प्रश्नांची उत्तरे द्या ! हे मी कोणतीही माहिती ऐकण्यापूर्विचे तीन फिल्टर आहेत.
पहिला फिल्टर म्हणजे 'सत्य' !
तू मला जे काही सांगणार आहेस ते अगदी खरे आहे याची तुला खात्री आहे का?"
"नाही, मी हे कुठूनतरी ऐकले आहे." माणूस म्हणाला.
सॉक्रेटिस म्हणाला, "ठीक आहे, ते खरे आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही. बरं मग माझा दुसरा फिल्टर 'गुड / चांगले' आहे.
तू माझ्या मित्राबद्दल चांगल्या गोष्टी सांगणार आहेस का?
"नाही,मी तर याउलट काहीतरी सांगणार आहे." माणूस म्हणाला.
सॉक्रेटिस पुढे म्हणाला, “ठीक आहे, तुला माझ्या मित्राबद्दल वाईट बोलायचे आहे, परंतु ते खरे आहे की नाही याची तुला खात्री नाही.
बरं ..ठीक आहे, आता तिसरा प्रश्न म्हणजे 'युटिलिटी / उपयुक्तता' साठी तिसरा फिल्टर आहे.
तुला माझ्या मित्राबद्दल असे काही सांगायचे आहे का जे माझ्यासाठी उपयुक्त आहे?"
तो माणूस म्हणाला, "नाही, खर सांगायचं तर उपयुक्तही नाही."
सॉक्रेटिस म्हणाला, "बरं, तुला मला जे सांगायचं आहे ते सत्य नाही, चांगलंही नाही, उपयुक्तही नाही, तर तू मला ते का सांगू इच्छितोस?"
आता त्या माणसाल कळून चुकले होते की मी चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय त्याने काही न बोलताच काढता पाय घेतला.
मित्रांनो, आपण या छोट्या कथेतून बरेच काही शिकू शकतो की गॉसिप हा तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवतात, तसेच तुम्ही ज्या लोकांना हे सांगत आहात आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात त्यांना आणि तुम्हाला त्या गोष्टीची उपयुक्तता किती आहे हे समजूनच विषय पुढे नेला पाहिजे.
तुमचा मौल्यवान वेळ स्वत: च्या विकासासाठी घालवला पाहिजे, गॉसिपमध्ये नाही.
Write a comment ...