आफ्रिकन सवानामध्ये, जेव्हा आई जिराफ आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा ती जमिनीवर बसत नाही , त्याऐवजी ते आपल्या उंच पायांवर उभ्या उभ्याच बाळाला जन्म देते आणि नुकतंच जन्मलेले कोवळ बाळ जमिनीवर धाडकन पडत
आठ ते नऊ फूट उंची आणि पायाखालची घट्ट रखरखीत जमिन कोवळ्या वासराला पडल्यामुळे खूप वेदना होतात पण आईचे हृदय आपल्या मुलाच्या वेदना पाहून वितळत नाही ती तिच्या बाळाला आपल्या घट्ट खुरांनी लाथा मरायला सुरुवात करते.
अर्भक वासरू वेदनेने कळवळत आणि जमिनीवर लोळत आणि ते उठण्याचा प्रयत्न करू लागतं.
आई जिराफ अजूनही धीर धरत नाही. ती पुन्हा तिच्या बाळाला लाथ मारते आणि जबरदस्तीने जमिनीवर पाडते
वासरू पुन्हा पाय घट्ट रोऊन उभ राहत तेव्हाच ती थांबते.
आई जिराफचे हे कठोर वर्तन आपल्याला अत्यंत क्रूर वाटू शकते. पण आईला माहित आहे की सिंह येण्यापूर्वी मुलाला चालायला शिकण्यासाठी फक्त काही मिनिटेच तिच्याकडे आहेत. नवजात बालकाला जमिनीवर लोळण्याचे सुख भोगासाठी वेळ नाही कारण हा क्षणिक आनंद त्याचा जीव घेण्यास वेळ लावणार नाही.
मूल वेदना झेलत पायावर उभं राहतं पण जगण्यासाठी वेदनांकडे दुर्लक्ष करायला सुद्धा शिकत.
आपण अनेकदा मुलांमध्ये आत्म-नियंत्रणाचे महत्त्व कमी लेखतो. स्टॅनफोर्ड मधील एक संशोधक - वॉल्टर मिशेल यांनी आत्म-नियंत्रणाचा अभ्यास करण्यासाठी एक प्रसिद्ध प्रयोग केला लहान मुलांची ही चाचणी ‘मार्शमॅलो टेस्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे
चाचणीने पाहिले गेलं की मुले तात्काळ मिळणाऱ्या आनंदाला (इन्स्टंट ग्रटीफिकेशनला) किती पुढे ढकलतात.
आणि दीर्घकालीन टिकणाऱ्या मुलाला त्यासाठी बक्षीस म्हणून जास्त मर्शमेलो मिळणार होते.
स्वयं-शिस्त मोजण्यासाठी कल्पकतेने डिझाइन केलेला हा प्रयोग नक्की बघा.👇
https://youtu.be/S_ZQHiYDXQI
(Unknown YouTube Channel)
आज आपण इंस्टा रिल्स, शॉर्ट व्हिडिओ, टीव्ही यांसारख्या तत्काळ आनंद देणाऱ्या गोष्टींमुळे पुस्तक, डॉक्युमेंटरी यांसारख्या माहिती देणाऱ्या आणि मोठी ध्येय ठरवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं यांसारख्या दीर्घकालीन आनंद देणाऱ्या गोष्टींपासून दूर होत चाललो आहोत.
त्यामुळे या मार्शमेलो पासून सावधान.
Write a comment ...